अंतराळातील स्फोट
...
हि कथा आहे, अंतराळातील एका विलक्षण घटनेची, एका ताऱ्याच्या स्फोटाची. सातव्या शतकात घडलेल्या ह्या अदभुत घटनेचे पडसाद मानवी संस्कृतीवर कित्येक शतके उमटले आणि अखेर येथील जीवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले. अनेक आव्हानांना सामोरे गेलेल्या मानवाने ह्या संकटाचा सामना कसा केला आणि राखेतून पुनर्भरारी घेण्याच्या त्याच्या विजिगीषु वृत्तीचे दर्शन देत, हि काल्पनिक विज्ञानकथा आपल्याला भूत, वर्तमान आणि भविष्य काळाची एक अनोखी सफर घडवते.
संगीत: अवधूत रहाळकर, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे